रत्नागिरी : जिल्हा परिषद आणि राज्यशासनाच्या जिल्हास्तरावरील पशु विभागातील श्रेणी २ मधील पशुवैद्यकीय दवाखाने श्रेणी १ मध्ये आणले जाणार आहेत. त्या ठिकाणी पशुधन पर्यवेक्षकाऐवजी पशुधन विकास अधिकारी हे पद निर्माण केले आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत असलेले ६७ दवाखाने श्रेणी २ मधून १ मध्ये वर्ग होणार आहेत. त्यामुळे पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या रिक्त पदांची संख्या वाढणार आहे.
जिल्हा परिषद पशू विभागाचे तालुकास्तरावर सहा चिकित्सालये आणि ग्रामीण भागात ६७ दवाखाने आहेत. तालुकास्तरावर पशुधन विकास अधिकारी नियुक्त आहेत तर पशूवैद्यकीय दवाखान्यांमध्ये पशुधन पर्यवेक्षक कार्यरत आहेत. रिक्त पदे अधिक असल्यामुळे या दवाखान्यांचा कारभार रामभरोसेच आहे. शासनाकडून पशुधन विकास अधिकारीपदाची भरती जाहीर केली आहे. राज्यात २ हजार ७९५ पदे भरली जाणार आहेत. त्यातील जिल्हा परिषदेसाठीची ६७ आणि राज्य शासनाच्या ८० दवाखान्यांसाठी मिळून १४७ पशुधन विकास अधिकारी मिळावेत, अशी मागणी पशू विभागाकडे करण्यात आली आहे.
नवीन बदलानुसार आवश्यक अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. ती पदे भरली गेली तर निश्चितच ग्रामीण भागातील प्रश्न सुटणार आहेत- आर. पी. नरुटे, पशुधन विकास अधिकारी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:47 AM 06/Jun/2025














