रत्नागिरी : रत्नागिरीचे माजी आमदार बाळासाहेब माने यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उपनेते म्हणून निवड झाली आहे. श्री. माने यांच्या निवडीबद्दल माजी खासदार विनायक राऊत यांच्या कार्यालयात शाल पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
सुरेंद्रनाथ ऊर्फ बाळासाहेब माने यांची पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करताना रत्नागिरी जिल्हा संपर्कप्रमुख सहदेव बेटकर, जिल्हाप्रमुख दत्तात्रय कदम, जिल्हाप्रमुख बाळा खेडेकर, शिवसहकार सेना रत्नागिरी जिल्हा संघटक चंद्रकांत शिंदे, शिवसहकार सेना जिल्हा समन्वयक परवेश घारे, विधानसभा क्षेत्र संघटक रामचंद्र ऊर्फ तात्या सरवणकर, शिवसहकार सेनेचे सर्व पदाधिकारी, उमेदवार उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 06-06-2025














