चिपळूणची हरिज्ञा शिंदे नौदलात सबलेफ्टनंट

चिपळूण : तालुक्यातील ओवळी, दसपटी येथील हरिज्ञा शिंदे भारतीय नौदलात सबलेफ्टनंट म्हणून रुजू होत आहेत. आपल्या कर्तृत्वाने केवळ आपल्या कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे. शनिवारी केरळ येथील एझिमाला येथे झालेल्या दिमाखदार पासिंग परेडनंतर त्यांनी देशसेवेचा हा गौरवशाली प्रवास सुरू केला आहे.

तालुक्यातून भारतीय नौदलात कमिशन्ड ऑफिसर होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

हरिज्ञा शिंदे यांचा हा प्रवास त्यांच्या अढळ दृढनिश्चयाचे आणि उत्कृष्टतेसाठी केलेल्या अथक प्रयत्नांचे प्रतीक आहे. त्यांच्या या यशाने प्रत्येक कोकणकरांच्या मनात अभिमानाची भावना निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातून भारतीय नौदलासारख्या प्रतिष्ठित सेवेत उच्च पदावर विराजमान होणे, हे हरिज्ञा यांच्या अपार मेहनतीचे फळ आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 06/Jun/2025