‘कोरे’ मार्गावरील मडगाव-एलटीटी उन्हाळी विशेष गाडीला मुदतवाढ

खेड : कोकण मार्गावर उन्हाळी सुटीसाठी चालवण्यात आलेल्या मडगाव-एलटीटी साप्ताहिक उन्हाळी विशेष प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभला. गावी आलेले चाकरमानी परतीला निघाल्यामुळे रेल्वेगाड्यांना होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मडगाव-एलटीटी उन्हाळी विशेषला ९ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.

मडगाव-एलटीटी साप्ताहिक उन्हाळी स्पेशल १ ते ८ जून तर परतीच्या प्रवासात २ ते ९ जूनदरम्यान धावेल. स्पेशलला मुदतवाढ देण्यात आल्याने परतीच्या प्रवासाला चाकरमान्यांना दिलासा मिळाला. या स्पेशलच्या फेऱ्यांचा प्रवाशांनी लाभ घ्यावा.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:01 AM 06/Jun/2025