रत्नागिरी : Worship of railway track कोकण रेल्वेच्या ट्रॅकमन, पोलिस बल आणि अधिकारी पदावर काम करणारे कर्मचारी प्रवाशांच्या सेवा आणि सुरक्षिततेसाठी संघर्ष करत असतात. दसऱ्याच्या मुहूर्तावर उद्योजक रवींद्र ऊर्फ अण्णा सामंत आणि त्यांच्या स्वरुपा सामंत यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार कार्यक्रमापूर्वी कोकण रेल्वे रुळाचे पूजन करण्यात आले.

रत्नागिरी : Worship of railway track
कोकण रेल्वे रुळाचे दसऱ्याच्या दिवशी दरवर्षी पूजन केले जाते. दरवर्षी उद्योजक अण्णा सामंत आणि स्वरुपा सामंत हस्ते गेल्या अनेक वर्षांपासून रुळ पूजा आणि सेवा बजावणाऱ्या प्रत्येक स्तरावरील कर्मचारी, अधिकाऱ्यांचा प्रातिनिधिक सत्कार केला जातो. शनिवारी दसऱ्याच्या दिवशी कोकण रेल्वेच्या प्रतीक्षालयात सत्कार झाला. कोकण रेल्वेमध्ये ट्रॅकमन, गँगमन, पोलिस, टीसी ते क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक अशा विविध पदांवर काम करणारे अधिकारी, कर्मचारी आहेत. या सर्वांची कामे म्हणजे प्रवाशांच्या सुखकर प्रवासासह सुरक्षेसाठी एकप्रकारे संघर्षच असतो. ही संघर्षपूर्वक सेवा देणाऱ्यांचा उद्योजक अण्णा सामंत आणि त्यांच्या स्वरुपा सामंत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
ratnagiri railway station : रत्नागिरी रेल्वेस्टेशन लोकार्पण
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 AM 14/Oct/2024

ratnagiri railway station : रत्नागिरी रेल्वेस्टेशन लोकार्पण
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं सुशोभीकरण केलेल्या रत्नागिरी रेल्वे स्थानकाचं लोकार्पण सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झालं. याच कार्यक्रमातून जिल्ह्यातल्या खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि राजापूर या अन्य रेल्वेस्थानकांचं लोकार्पण देखील दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं. या वेळी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, कोकण रेल्वेचे रत्नागिरी विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट यांच्यासह भाजप आणि शिवसेनेचे नेते उपस्थित होते.
सुशोभिकरणानंतर रेल्वेस्थानकं विमानतळांसारखी भव्य दिसत आहेत. स्थानकांमध्ये कोकण रेल्वेचे शिल्पकार मधू दंडवते यांची प्रतिमा लावण्यात आली असून, दर्शनी भागात व्हर्टिकल गार्डनही तयार करण्यात आलं आहे. चित्रांनी भिंती सजवण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वेच्या एकूण ३२ रेल्वेस्थानकांचं टप्प्याटप्प्यानं सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधल्या १२ स्थानकांचा समावेश होता, असं चव्हाण यांनी सांगितलं.
राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागानं सुशोभीकरण केलेल्या रत्नागिरी रेल्वे स्थानकाचं लोकार्पण सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते झालं. याच कार्यक्रमातून जिल्ह्यातल्या खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि राजापूर या अन्य रेल्वेस्थानकांचं लोकार्पण देखील दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आलं. या वेळी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, कोकण रेल्वेचे रत्नागिरी विभागीय व्यवस्थापक शैलेश बापट यांच्यासह भाजप आणि शिवसेनेचे नेते उपस्थित होते.सुशोभिकरणानंतर रेल्वेस्थानकं विमानतळांसारखी भव्य दिसत आहेत. स्थानकांमध्ये कोकण रेल्वेचे शिल्पकार मधू दंडवते यांची प्रतिमा लावण्यात आली असून, दर्शनी भागात व्हर्टिकल गार्डनही तयार करण्यात आलं आहे. चित्रांनी भिंती सजवण्यात आल्या आहेत. कोकण रेल्वेच्या एकूण ३२ रेल्वेस्थानकांचं टप्प्याटप्प्यानं सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधल्या १२ स्थानकांचा समावेश होता, असं चव्हाण यांनी सांगितलं.











