रत्नागिरी : ज्येष्ठ नागरिकांसाठीची रेशन कार्ड डिजिटलायझेशन मोहीम यशस्वी

रत्नागिरी : रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाने तहसीलदार, रत्नागिरी यांच्या सहकार्याने राबवलेल्या रेशन कार्ड डिजिटलायझेशन विशेष मोहिमेमुळे शहरातील असंख्य ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या उपक्रमांतर्गत, 22 मे 2025 रोजी आयोजित शिबिरात 46 कार्डधारकांची रेशन कार्ड 12 अंकी डिजिटल करण्यात आली.

या मोहिमेदरम्यान, नायब तहसीलदार, श्रीमती निशा पाईकराव यांनी उपस्थित असलेल्या अन्य 35 लोकांना रेशन कार्ड डिजिटलायझेशन प्रक्रियेबद्दल योग्य ते मार्गदर्शन केले. रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या या जनोपयोगी उपक्रमाबद्दल शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

अध्यक्ष सुभाष थरवळ यांचे आवाहन:
ज्या नागरिकांची रेशन कार्ड अद्याप 12 अंकी झालेली नाहीत, अशा सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन संघाचे अध्यक्ष श्री. सुभाष थरवळ यांनी केले आहे. या मोहिमेमुळे ज्येष्ठ नागरिकांना शासकीय सुविधांचा लाभ घेणे अधिक सोपे होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:44 06-06-2025