सावर्डे येथे हातभट्टी दारूविक्रीवर पोलिसांची कारवाई; एका महिलेवर गुन्हा दाखल

चिपळूण, रत्नागिरी: चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथे पोलिसांनी गावठी हातभट्टी दारूविक्रीवर कारवाई केली आहे. काल, 5 जून 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास निवळी कोष्टीवाडी येथील एका खोपीच्या आडोशाला ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी यावेळी 9 लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त केली आहे.

या घटनेबाबत सावर्डे पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोकॉ सनिल दिनकर भांगरे (वय 31, पोकॉ/551) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार, आरोपी नीता रवींद्र झिंगे (वय 65, रा. निवळी, कोष्टीवाडी, ता. चिपळूण) ही नमूद ठिकाणी बिगरपरवाना आणि बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू बाळगून असल्याची माहिती मिळाली होती.

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, नीता झिंगे हिच्या ताब्यातून 950 रुपये किमतीची 9 लिटर गावठी हातभट्टी दारू आणि इतर संबंधित साहित्य असा एकूण 960 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला.

या प्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात काल रात्री 7 वाजून 26 मिनिटांनी महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65(ई) नुसार गुन्हा (गु.र.नं. 55/2025) दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अवैध दारूविक्री विरोधात पोलिसांची ही मोहीम सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 06-06-2025