देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा, जाधववाडी येथे काल, 5 जून 2025 रोजी सकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास विजेच्या धक्क्याने एका 79 वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. घराशेजारील विजेच्या तुटलेल्या तारेचा स्पर्श झाल्याने हा अपघात घडला.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हृदया शांताराम मोरे (वय 79, रा. साखरपा, जाधववाडी, ता. संगमेश्वर) या काल सकाळी घरातील चूल पेटवण्यासाठी घराशेजारील लाकडे आणायला गेल्या होत्या. त्याचवेळी त्यांच्या घराशेजारी असलेल्या एमईसीबीसी (MSEB) च्या मेन लाईटच्या खांबावरील एक तार अर्धवट तुटून जमिनीवर पडलेली होती.
लाकडे आणत असताना, हृदया मोरे यांचा उजव्या हाताने या तुटलेल्या तारेला स्पर्श झाला आणि त्यांना जोरदार विजेचा धक्का बसला. विजेचा धक्का लागल्याने त्या तात्काळ बेशुद्ध होऊन जमिनीवर पडल्या. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रिक्षाने साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद देवरुख पोलिस ठाण्यात आमृ. क्रमांक 14/2025 बी.एन.एस.एस 194 प्रमाणे करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे जाधववाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 06-06-2025














