छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल, रत्नागिरीतील 70 वर्षीय वृद्धाचा दुर्दैवी मृत्यू

रत्नागिरी : शहरातील गांजूर्डा, शिरगाव येथील एका 70 वर्षीय वृद्धाचा काल, 5 जून 2025 रोजी सिव्हिल रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. रमेश रघुनाथ शेट्ये असे या मृत वृद्धाचे नाव आहे. त्यांना छातीत दुखत असल्यामुळे आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळी 4:45 वाजण्याच्या सुमारास रमेश शेट्ये हे त्यांच्या राहत्या घरी असताना, त्यांना अचानक छातीत तीव्र वेदना होऊ लागल्या आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. कुटुंबातील सदस्यांनी तात्काळ त्यांना ॲम्ब्युलन्सने रत्नागिरी येथील सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच, सायंकाळी 5:35 वाजता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रमेश शेट्ये यांना मृत घोषित केले. ‘मायोकार्डियल इन्फार्क्शन इन केस ऑफ काउंटर कॅरामांग सिंड्रोम’ (Myocardial Infarction in case of Counter Carramang Syndrome) हे त्यांच्या मृत्यूचे कारण असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात या घटनेची आमृ. क्रमांक 52/2025 बी.एन.एस.एस 194 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे शेट्ये कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:41 06-06-2025