राजापूरमध्ये 85 वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळला; तीन दिवसांपासून होते बेपत्ता

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील डोंगर मिरासवाडी येथे 85 वर्षीय वृद्धाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदाशिव तुकाराम शेलार (वय 85, रा. डोंगर मिरासवाडी, ता. राजापूर) असे मृत वृद्धाचे नाव असून, ते 2 जून 2025 पासून बेपत्ता होते.

मिळालेल्या माहितीनुसार, सदाशिव शेलार हे 2 जून 2025 रोजी डोंगरदेवी मंदिरात जातो असे सांगून घरातून बाहेर पडले होते, त्यानंतर ते परतलेच नाहीत. कुटुंबीयांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ते मिळून आले नव्हते. अखेर, काल, 5 जून 2025 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास, पांढरआंबा येथील शेतीत वाळंबे धरणाकडे जाणाऱ्या पायवाटेच्या शेजारी त्यांचा मृतदेह आढळून आला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची पाहणी केली असता, त्यांच्या डोक्याला दुखापत (head injury) झाल्याचे निष्पन्न झाले. राजापूर पोलिस ठाण्यात या प्रकरणी आमृ. क्रमांक 31/2025 बी.एन.एस.एस 194 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:43 06-06-2025