रत्नागिरी-लातूर एस. टी. बसमध्ये प्रवाशाचा मृत्यू

रत्नागिरी : रत्नागिरी ते लातूर जाणाऱ्या एसटीतील प्रवाशाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ५ वा. सुमारास घडली. दादमियाँ अब्दुल्ला मजगावकर (६०, रा. कोकणनगर, रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ते सांगलीला जाण्यासाठी मारुती मंदिर येथील बसस्टॉपवर रत्नागिरी ते लातूर जाणाऱ्या एसटीमध्ये बसले. एसटी कुवारबाव येथे आली असता वाहकाने त्यांच्याकडे जाऊन तिकिट घेण्याबाबत विचारणा केली. परंतू दादमियाँ यांची कोणतीही हालचाल होत नव्हती. ते काही बोलत नसल्याने वाहकाने त्यांना हलवले असता ते सीटला टेकून निपचित पडले. ही बाब वाहकाने एसटी चालक विवेकानंद गुगणारे यांना सांगताच त्यांनी तातडीने एसटी जिल्हा शासकीय रुग्णालयात वळवली, सकाळी ५.४० वा. सुमारास तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दादमियाँ यांना तपासून मृत घोषित केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:00 AM 14/Oct/2024