नृत्यार्पण नृत्य अकादमीच्या नृत्यांगनाचे गोवा येथील स्पर्धेत घवघवीत यश

◼️ भारत नृत्य महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गुरु सौ. प्रणाली तोडणकर धुळप आणि शिष्याचे उत्तम सादरीकरण

रत्नागिरी : कला अकादमी गोवा येथे झालेल्या अखिल नटराजम आंतर सांस्कृतिक संघाच्या भारत नृत्य महोत्सव या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेमध्ये रत्नागिरीच्या नृत्यार्पण नृत्य अकादमीच्या संचालिका आणि गुरु सौ. प्रणाली तोडणकर – धुळप आणि त्यांच्या सहभाग घेतलेल्या सर्व 11 शिष्यांनी देदीप्यमान यश मिळवला आहे.

यामध्ये नृत्यार्पण नृत्य अकादमीच्या संचालिका आणि भरतनाट्यम नृत्याच्या गुरू सौ. प्रणाली तोडणकर – धुळप यांना उत्तम नृत्यदिग्दर्शक म्हणून नृत्य भारती पुरस्कार तसंच नृत्य कलाकृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याशिवाय त्यांच्या 11 शिष्यांना सुद्धा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

त्यामध्ये बालगटामध्ये मीरा झगडे हिने दुसरा क्रमांक पटकावला. छोट्या गटामध्ये तीर्था वैद्य प्रथम, भूमिका गुरव, ज्ञानदा नातू, सानवी नरवणे यांना द्वितीय तर अनन्या योगेश मगदूम हिला तृतीय आणि शुभ्रा आमरे हिला चौथा क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. तर मोठ्या गटामध्ये श्रावणी सावंत हिचा दुसरा, बिल्वा रानडे, भक्ती जोशी आणि सलोनी पुसाळकर यांचा तिसरा क्रमांक आला आहे.

या सर्वांना प्रसिद्ध लावणी प्रिन्स शुभम बोराडे आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक वैभव घुगे आणि अन्य परीक्षकांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. नृत्यार्पण नृत्य अकादमीच्या सहभागी झालेल्या सर्वांनीच या स्पर्धेत यश मिळवले. सर्वच विजयी स्पर्धकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:57 06-06-2025