खेड : वेरळ येथे ‘स्वच्छ भारत अभियान’ उपक्रम

खेड : तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कब बुलबुल व स्काऊट गाईड पथकामार्फत ‘स्वच्छ भारत अभियान’ उपक्रमांतर्गत प्रशालेमध्ये सर्वधर्मीय प्रार्थना, वृक्षारोपण, गीत गायन व चित्रकला स्पर्धा इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले. इयत्ता तिसरी ते पाचवीच्या कब व बुलबुलच्या विद्यार्थ्यांमध्ये गीतगायन व चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये तक्ष यादव, अर्णव महागावकर, समर्थ कराड, श्लोक पाटील, माहिर मणियार, स्वराज मोरे, यज्ञेश भिंगारे, तेजस मोरे, शिव पाटणे, युनुस तळवळकर, विशाल परमार, युसुफ खोत प्रणाली गायकर, मृण्मयी भाबल, आर्वी खेडेकर, आर्या कासार, इलाफ बडे, श्रीजा फडतारे, दर्शना गडीलोहार, ओवी जाधव या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले. या सर्व विद्यार्थ्यांना फ्लॉक लिडर राधा चव्हाण व कब मास्तर मेघा साळुंखे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, संस्थेचे चेअरमन उदय शेटवे, खजिनदार दिग्विजय इंदुलकर, प्रशालेचे प्राचार्य डॉ. एस. एस. अली, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 14/Oct/2024