चिपळूण : चिपळूण शहरातील गोवळकोट, गोवळकोट रोड येथे गुरे रस्त्यावर फिरत असल्याने रस्त्यावर चालणाऱ्या पादचाऱ्यांना तसेच वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. गुरांमुळे होणाऱ्या अपघाताला सर्वस्वी जबाबदार नगरपालिका असेल. तात्काळ नगरपालिकेने रस्त्यावर फिरणाऱ्या गुरांचा बंदोबस करावा अशी मागणी युवक कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह यांनी केली आहे.
गोवळकोट, गोवळकोट रोड हे चिपळूण शहरातील गजबजलेले ठिकाण आहे. याच रस्त्याला अनेक रस्ते जोडलेले आहेत यात चिपळूण रेल्वे स्टेशन, गुहागर, लाईफ केअर हॉस्पिटल, मुंबई व चिपळूण शहरात जाणारा रस्ता असल्याने या ठिकाणी कायम नागरिकांची व वाहन चालकांचे वर्दळ असते.
गेल्या पंधरा दिवसापासून पाऊस सुरू झाला आहे. गुरे रस्त्यावर फिरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचा वातावरण पसरल असून रात्रीच्या वेळेस गुरे रस्त्याच्या मधोमध बसलेली असतात. तसेच रस्त्यावर फिरत असतात त्यामुळे अपघात सुद्धा होत आहेत. तात्काळ गुरांचा बंदोबस्त करावा अन्यथा गुरांना नगरपालिकेच्या आवारात बांधण्यात येईल असा इशारा युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह यांनी दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:10 PM 06/Jun/2025














