गुहागरमधील तरुणाची १३ लाखांची फसवणूक

गुहागर : मेडिकल कॉलेजला ऍडमिशन देतो, असे सांगून गुहागरमधील एका तरुणाची १३ लाखाला फसवल्याची घटना घडली आहे. याबाबत किरण संपतराव सन्मुख यांनी आपली फसवणूक झाल्याची फिर्याद दाखल केली आहे. आपण मेडिकल अॅडमिशन कौन्सिलर असल्याचे भासवून एमबीबीएसला आपल्या मुलाचे अॅडमिशन करून देतो, असे खोटे सांगत गुहागर तालुक्यातील चिखली येथील किरण संपतराव सन्मुख या व्यक्तीला तब्बल १३ लाखाला गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी गुहागर पोलिस ठाण्यामध्ये तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गुहागर पोलिस ठाण्यामध्ये हिमांशू मिश्रा, जयंत मिश्रा व उमंग मिश्रा या अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास गुहागरचे पोलिस निरीक्षक सचिन सावंत करीत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:15 AM 14/Oct/2024