गुहागर : पालशेत येथील पुलाचे आ. भास्कर जाधव यांच्या हस्ते उद्घाटन

गुहागर : तालुक्यातील मोडकाआगर ते तवसाळ मार्गावरील पालशेत बाजारपेठ येथील सहा कोटी रुपये खर्चाच्या पुलाचे उद्घाटन आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रवीण ओक, पांडुरंग कापले, रामाणे गुरुजी, शिवसेनेचे विभागप्रमुख राजू गुहागरकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व पालशेत येथील ग्रामस्थ व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, ठेकेदार सुरेश चिपळूणकर आदी उपस्थित होते. या नवीन पुलाच्या उभारणीसाठी आमदार भास्कर जाधव यांनी सहा कोटी रुपये निधी मिळवून दिल्याने ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू गुहागरकर यांनी केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 14/Oct/2024