गुहागर : मनसेच्यावतीने आज मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर

गुहागर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या पुढाकाराने मनसे गुहागर विधानसभा क्षेत्र व अपरांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चिपळूण यांच्या सहकायनि मोफत महाआरोग्य तपासणी शिबिर सोमवार, दि. १४ ऑक्टोबर रोजी जानवळे शाळा क्रमांक १ येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये ब्लड प्रेशर, पल्स, वजन उंची वाढणे, ऑक्सिजन चिकित्सा तपासणी, अस्थिरोग तपासणी, हृदयरोग तपासणी, दम लागणे, वजन वाढणे, उच्च रक्तदाब थायरॉईड, डोकेदुखी, गुडघेदुखी, पित्ताचा त्रास, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, विद्यार्थ्यांसाठी ब्लड ग्रुप व आरोग्य शिबिर, नाक कान घसा व डोळे, रक्तगट आदी मोफत तपासणी होणार आहे. शिबिरादरम्यान अर्ध्या किमतीत चष्मे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 14/Oct/2024