दापोली : खडकाला धडकलेल्या डंपरचे मोठे नुकसान

दापोली : तालुक्यातील हर्णे बंदराच्या जेटीसाठी माती दगड वाहतूक करणारा डंपर खडकावर आदळून वाळूत अडकला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, डंपरचे खूप नुकसान झाले.

हर्णे जेटीच्या कामाला सुरुवात झाली आहे. जेटीचे काम करताना कनकदुर्ग किल्ल्याकडून भराव टाकण्यासाठी माती आणि दगड वाहतूक केली जात आहे. ही वाहतूक नवानगर येथून थेट वाळूवरून डंपर उतरवून खडकातून रस्ता काढण्यात आला आहे. तेथून थेट किनाऱ्यावरून पुळणीतूनच ज्या ठिकाणी भराव टाकायचा आहे त्या ठिकाणी नेण्याची वाहतूक केली जात आहे. पावसाळ्याच्या दिवसात किनाऱ्यावर जाणे खूपच धोकादायक असते. कारण वाळू भुसभुशीत झालेली असते.

समुद्राला भरती ओहोटी सुरूच असते. समुद्र खवळलेला असतो. अशा परिस्थितीत या वाळूवरून मोठ्या डंपर ची वाहतूक करणे धोकादायक आहे. बुधवारी (ता. ४) सायंकाळी आणि दगड घेऊन जात होता. हा डंपर भरधाव वेगात होता. त्यावेळी समुद्राला भरती देखील होती. यावेळी हा डंपर खडकावर आदळून त्याचठिकाणी वाळूत रुतला आणि जोरदार खडकावर आदळल्याने टायर फुटला पुढच्या भागाचे खूप नुकसान झाले. वाळूत रुतलेला डंपर रात्री उशिरा क्रेन व दोन जेसीबीच्या साह्याने काढण्यात आला. एवढी मोठी घटना घडून देखील अजूनही त्याच मागें जेटीवर डंपरची वाहतूक सुरूच आहे.

एक डंपर याच जेटीसाठी माती
घडलेला प्रकार खूपच धोकादायक आहे. मुख्य रस्त्यावरून तर ही वाहतूक शक्यच नाही. जेट्टीचे काम चालू होतं असतानाच ग्रामपंचायतीकडून शासनाला वाहतुकीकरिता लागणार मार्ग हा स्थानिकांना कोणताही त्रास होऊ नये अशा परिस्थितीत काढावा असे पत्र देखील दिले होते तरीही अजूनही ही अशा प्रकारची वाहतूक सुरू आहे- सना काझी (हर्णे ग्रामपंचायत सदस्य)

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 07/Jun/2025