रत्नागिरी : रत्नागिरी येथील कोकण रेल्वे स्टेशनवरील एसी लाउंजमध्ये गुरुवारी, ६ जून २०२५ रोजी सकाळी ८.५५ वाजताच्या सुमारास २५,००० रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०५ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत नाशिकच्या एका तरुणाला अटक केली आहे.
सदाफ फकीर महम्मद शेख (वय ३८, रा. पाडावेवाडी, मिरजोळे, रत्नागिरी) यांनी या घटनेसंदर्भात गुरुवारी दुपारी ३.०३ वाजता रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीनुसार, कोकण रेल्वे स्टेशनच्या एसी लाउंजमधील रिसेप्शन टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली २५,००० रुपये रोख रक्कम असलेला डबा चोरीला गेला होता.
पोलिसांनी केलेल्या तपासात तेजस अजित छाबडा (वय ३२, रा. इगतपुरी, लोहियारोड, नगर परिषद जवळ, जि. नाशिक) या तरुणाने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. रेल्वे स्थानकासारख्या सार्वजनिक ठिकाणी झालेल्या या चोरीमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 07-06-2025














