रत्नागिरी : नवीन लॅपटॉप, प्रिंटर्स, किंवा प्रमाणित वॉरंटीसह रिफर्बिश्ड लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे! कॉम्पटेल एक्स्पो २०२५ चे आयोजन रत्नागिरीतील हॉटेल ड्राईव्ह-ईन कार्निव्हल येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा आज, ७ जून २०२५, शेवटचा दिवस आहे.
मारुती मंदिर येथील हॉटेल ड्राईव्ह-ईन कार्निव्हलमध्ये सकाळी १०:३० ते सायंकाळी ७:०० या वेळेत तुम्ही या एक्स्पोला भेट देऊ शकता. कॉम्पटेल एक्स्पोमध्ये तुम्हाला लॅपटॉप, प्रिंटर्स, आणि प्रमाणित वॉरंटीसह रिफर्बिश्ड लॅपटॉप्सची विस्तृत श्रेणी पाहायला मिळेल.
या प्रदर्शनातून कोणतीही खरेदी केल्यास तुम्हाला आकर्षक भेट मिळणार आहे. तसेच, ग्राहकांच्या सोयीसाठी कर्ज (लोन) सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या गरजेनुसार उत्पादन खरेदी करणे अधिक सोपे होईल.
गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या एक्स्पोला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. आज शेवटचा दिवस असल्याने, तंत्रज्ञानाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि आकर्षक ऑफरचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी या एक्स्पोला आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:49 07-06-2025














