रत्नागिरीत चोरीचा प्रकार : अमृतसृष्टी येथील घरातून २.६५ लाखांचे दागिने लंपास!

रत्नागिरी : शहरातील अमृतसृष्टी, सन्मित्रनगर येथे एका घरातून सुमारे २ लाख ६५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना १६ मे २०२४ पूर्वी घडली असून, गुरुवारी, ६ जून २०२५ रोजी सायंकाळी ५.०७ वाजता रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी महेश दगडू गुरव (वय ४९, रा. बालाजी स्कायचॅलेट, लांजेकर कंपाउंड, जेल रोड, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, १६ मे २०२४ पूर्वी, नेमकी तारीख आठवत नसताना, आरोपी त्यांच्या घरी आले. घरात येऊन कपाटात ठेवलेले दागिने फिर्यादीच्या संमतीशिवाय, लबाडीच्या इराद्याने चोरून नेले असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

चोरीला गेलेला ऐवज:

५५ ग्रॅम वजनाचे एक सोन्याचे मंगळसूत्र, किंमत २,२०,००० रुपये.
११ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, किंमत ४५,००० रुपये.
एकूण चोरीला गेलेल्या मालाची किंमत २,६५,००० रुपये आहे.
या गुन्ह्यात बाळ क्षीरसागर (पूर्ण नाव अज्ञात) आणि एक महिला, दोघेही अमृतसृष्टी, सन्मित्रनगर, रत्नागिरी येथील रहिवासी, यांचा आरोपी म्हणून समावेश आहे. पोलिसांनी भारतीय दंड विधान कायदा कलम ३८० (चोरी) आणि ३४ (सामूहिक उद्देशाने केलेले कृत्य) अंतर्गत गुन्हा क्रमांक २४०/२०२५ दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:57 07-06-2025