रत्नागिरी : “SPARSH” प्रणालीमध्ये अनेक माजी सैनिकांची व कुटुंब पेन्शनधारकांची काही महत्त्वाची माहिती अद्ययावत झालेली नाही. त्यामुळे भविष्यात कोणतीही अडचण उद्भवू नये व पेन्शन थांबण्याची शक्यता टाळता यावी, यासाठी आपले आधार क्रमांक, पॅन क्रमांक, ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक, डिजिटल लाईफ सर्टिफिकेट (Digital Life Certificate) तातडीने अद्ययावत करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.
जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक व कुटुंब पेन्शनधारक यांनी आपला आधार क्रमांक, पॅन क्रमांक, मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी आपल्या PPO मध्ये तपासुन पहा व ज्यांचा नसेल त्यांनी लवकरात लवकर ई-मेल किंवा नोंदणीकृत टपालाद्वारे आपल्या संबंधित अभिलेख कार्यालयात (Record Office) ला पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:25 AM 07/Jun/2025














