गुहागर तालुक्यात पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू

गुहागर : श्री संत सद्‌गुरू बाळूमामा पोलीस करियर अकॅडमीतर्फे गुहागर तालुक्यात प्रथमच पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्र आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र नुकतेच सुरू करण्यात आले असून या प्रशिक्षण केंद्राचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या पाठीमागे गुहागर तालुका कुंभार समाज भवन येथे उत्साहात पार पडला.

यावेळी चिपळूणचे डिफेन्स आर्मी मॅन मंदार चव्हाण, गुहागर हायस्कूलचे मुख्याध्यापक शामराव कांबळे, महाराष्ट्र सुरक्षा बल एएसओ अमेय बारगुडे, गुहागर तालुका कुंभार समाज अध्यक्ष आणि रत्नागिरी जिल्हा शिक्षक पतपेढीचे उपाध्यक्ष अरविंद पालकर, खजिनदार मदन कुंभार, सचिव चंद्रकांत साळवी, अॅड. प्रमेय आर्यमाने, युवा नेते उमेश खैर, सौ. पूजा अरविंद पालकर, सुधाकर कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिस भरती इच्छुक उमेदवारांनी तसेच स्पर्धा परीक्षेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी आपले अॅडमिशन लवकरात लवकर करून घ्यावे तसेच ग्रामीण भागातील युवक-युवतींनी जास्तीत जास्त प्रशासन सेवेत यावेत यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे सांगताना येणाऱ्या १० हजारांहून अधिक पोलिस भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन श्री संत सद्‌गुरू बाळूमामा पोलिस करियर अकॅडमीचे मार्गदर्शक तन्मय दिनेश देवरुखकर यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 07/Jun/2025