रत्नागिरी रेल्वे स्थानकात बेशुद्ध पडलेल्या प्रवाशाचा मृत्यू

रत्नागिरी : रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर बेशुद्ध पडलेल्या प्रवाशाचा उपचारांदरम्यान जिल्हा रुग्णालयात आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वा. सुमारास घडली. शिवाजी सीताराम तावरे (रा. नालासोपारा-ठाणे, मूळ रा. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. शिवाजी तावरे हे मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी कोकणकन्या एक्स्प्रेसने मुंबई ते रत्नागिरी असा प्रवास करीत होते. सकाळी ६ वा. ते रत्नागिरी रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर ते बेशुद्ध होऊन पडले. तेव्हा रेल्वे पोलिसांनी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी उपचार सुरू असताना ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वा. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:31 AM 14/Oct/2024