रत्नागिरी : केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत एप्रिल ते जुलै या कालावधीतील २० वा हप्ता लाभार्थ्यांना २० जून रोजी वितरित करण्यात येणार आहे. मात्र, ई-केवायसी व आधार सीडिंग अनिवार्य आहे.
ई-केवायसी व आधार सीडिंग पूर्ण करण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामस्तरीय व्हिलेज नोडल अधिकारी (VNO), कृषी सहायक आणि सामाजिक सुविधा केंद्रे (CSC) नियुक्त करण्यात आली आहेत. संबंधित शेतकऱ्यांनी त्यांच्या संपर्कात राहून ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
अॅग्रिस्टॅक (Agristack) योजनेंतर्गत पीएम किसान लाभार्थ्यांसाठी फार्मर आयडी तयार करणे आवश्यक असल्याने, आतापर्यंत १ लाख २५ हजार ७४० लाभार्थ्यांनी फार्मर आयडी तयार केला आहे. अद्याप ४६ हजार ७१७लाभार्थी यापासून वंचित आहेत.
उर्वरित लाभार्थ्यांनी mhfr.agristack.gov.in या पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी. तसेच CSC केंद्र आणि कृषी, महसूल, ग्रामविकास विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्यामार्फत ग्रामस्तरावर नोंदणीचे काम सुरू आहे. त्यांच्याशी संपर्क करून नोंदणी करावी. या योजनेंतर्गत पात्र आणि अॅग्रिस्टॅक योजनेंतर्गत फार्मर आयडी तसेच ई-केवायसी व आधार सीडिंग प्रलंबित असलेल्या सर्व लाभार्थ्यांनी कृषी विभाग, महसूल विभाग, ग्रामविकास विभाग तसेच सामायिक सुविधा केंद्र यांच्याशी संपर्क साधून प्रलंबितता पूर्ण करावी, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:11 PM107/Jun/2025














