RCB Stampede Case: विराट कोहली विरोधात पोलिस स्थानकात तक्रार

RCB Stampede Case Bengaluru Police Confirmed No FIR Has Been Registered Against Virat Kohli : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाने पहिले वहिले आयपील जतेपद पटकवल्यावर बंगळुरु शहरात RCB च्या चाहत्यांनी मोठी गर्दी करून केलेल्या विजयी सेलिब्रेशन वेळी दुर्दवी घटना घडल्याचे पाहायला मिळाले.

बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियम ४ जून रोजी झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्दैवी घटनेत ११ लोकांनी आपला जीव गमावला असून अनेक लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणात भारतीय क्रिकेटर आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघाचा IPL चॅम्पियन विराट कोहली याच्या विरोधातही तक्रार दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते असेलल्या एचएम व्यंकटेश यांनी बंगळुरु येथील कंबन पार्क पोलिस स्थानकामध्ये स्टार क्रिकेटरच्या विरोधात तक्रार नोंदवली आहे.

विराट कोहली विरोधातील तक्रारीसंदर्भात पोलिसांची प्रतिक्रिया

या प्रकरणात अनेकजणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली असली तरी कोहलीवर अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल केलेला नाही. यासंदर्भात आता पोलिसांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, पोलिस अधिकारी म्हणाले आहेत की, विराट कोहली विरोधातील तक्रारीनंतर त्याच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हा नोंदवलेला नाही. संबंधित प्रकरणात नोंदवलेल्या गुन्ह्याअंतर्गत तपासात या तक्रारीसंदर्भातील समीक्षण करण्यात येईल.

काय आहेत विराट कोहलीवरील आरोप?

एचएम व्यंकटेश यांनी विराट कोहलीवर केलेल्या तक्रारीत म्हटलंय की, आयपीएलच्या माध्यमातून विराट कोहली हा जुगाराला प्रोत्साहन देतो. तो आरसीबीचा प्रमुख चेहरा असून त्याच्यामुळेच मोठ्या संख्यने लोक बंगळुरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर एकत्रित झाले होते. कोहलीसह आरसीबीच्या संघावर या प्रकरणात गुन्हा दाखल करून त्यावर कायदेशीर कारवाई व्हायला हवी, अशी व्यंकटेश यांनी केली आहे.

बंगळुरु चेंगराचेंगरी प्रकरणात आतापर्यंत किती लोकांना अटक झाली?

आरसीबीच्या जेतेपदाचे सेलिब्रेशन वेळी झालेल्या चेंगराचेंगरीच्या प्रकरणात आतापर्यंत चौघांना अटक झाली आहे. यातआरसीबीचे वरिष्ठ अधिकारी निखिल सोसाले यांच्यासह इवेंट मॅनेजमेंटमधील तिघांचा समावेश आहे. ६ जूनला या चौघांना अटक करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना सत्र न्यायालयानं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:35 07-06-2025