दांडिया खेळताना चक्कर येऊन विद्यार्थिनीचा मृत्यू; राजापूर पाचल येथील घटना

राजापूर : सरस्वती पूजना निमित्ताने शाळेमध्ये दांडिया सुरू असताना चक्कर येऊन विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील पाचल येथे घडली.

रायपाटण येथील पोलिसांच्या माहितीनुसार, सरस्वती पूजनाचा कार्यक्रम पाचल येथील सरस्वती विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात सुरू होता. यावेळी प्रशालेमध्ये मुले दांडिया खेळत असताना वैष्णवी प्रकाश माने (१६, रा. आजिवली, ता. राजापूर) या मुलीला अचानक चक्कर आली. ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 14-10-2024