खेड : खेड-आंबवली मार्गावरील सुकिवली-सोनारवाडीनजीक गुरुवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला. अशोक राठोड (40, रा. वेरळ-खेड) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे.
सामाजिक कार्यकर्ते सुरज हंबीर यांनी त्याला उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. ते आपल्या ताब्यातील दुचाकीने (के.ए.28/ई.के. 6309) प्रवास करत असताना सुकिवली- सोनारवाडीजवळील वळणावर अपघात घडला. यामध्ये त्यांना दुखापती झाल्या. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:29 PM 07/Jun/2025














