खेड : ज्ञानदीप महाविद्यालयातील महिला बास्केटबॉल संघाची मुंबई विद्यापीठीय स्पर्धेसाठी निवड

खेड : तालुक्यातील मोरवंडे-बोरज येथील ज्ञानदीप महाविद्यालय विज्ञान व वाणिज्य महिला बास्केटबॉल संघाची मुंबई विद्यापीठ येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी निवड झाली.

रत्नागिरी येथे पार पडलेल्या कोकण विभाग ४ महिला बास्केटबॉल स्पर्धेच्या निवड चाचणीमध्ये ज्ञानदीप महाविद्यालय महिला बास्केटबॉल संघ सहभागी झाला होता. या स्पर्धेमधून ज्ञानदीप महाविद्यालयाच्या महिला संघाचा मुंबई विद्यापीठ येथे होणाऱ्या आंतरविभागीय स्पर्धेसाठी कोकण विभागाचे प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. ज्ञानदीप महाविद्यालयामधून पूर्वा जोशी, बास्मा खान, झारा तांबे, आकसा कवचाली, सान्वी पाटणे, ज्ञानेश्वरी सालीम, पूर्वा कुळे, प्राची साळवी, श्रावणी कदम, पूर्णा ठाकूर, साक्षी पिंपरे या विद्यार्थिनींची महिला बास्केटबॉल संघात निवड करण्यात आली. महाविद्यालयाचे राष्ट्रीय आदर्श क्रीडा शिक्षक प्रा. मंगेश सकपाळ यांची निवड संघ प्रशिक्षक म्हणून करण्यात आली.