देवरूख : नजीकच्या साडवली सह्याद्रीनगर मित्रमंडळातर्फे नवरात्रौत्सव उत्साहात साजरा झाला. यावेळी फॅन्सी ड्रेस दांडिया स्पर्धेत २८ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेत विविध वेशभूषा परिधान करून स्पर्धकांनी रंगत आणली.
यात लहान गटात आराध्या वाडकर, श्रावणी भिंगार्डे, सान्वी कदम, तनुजा वाडकर, आरोही वाडकर, धनश्री वाडकर व ग्रुपने बक्षिसे पटकावली. मोठ्या गटाचे भाई कुमटेकर, नीलेश वाडकर, मोहन कनावजे यांनी परीक्षण केले. यामध्ये एस. आर. बॉईज, भंडारवाडी, ऋतुराज देवरुखकर, सागर चव्हाण, बच्ची ग्रुप, तन्वी चव्हाण, अवधुत मांगले व ग्रुपने बक्षिसे पटकावली. रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन विजेत्यांना गौरवण्यात आले.
लहान गटासाठी कोकण प्रॉपर्टी एक्स्पोचे मालक गणेश खामकर यांनी रोख बक्षिसे दिली. गणेश खामकर व सोनाली नलावडे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. बक्षीस वितरण शिवसेना उबाठा गटाच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग महिला विभाग प्रमुख नेहा माने व माजी सरपंच राजू जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:41 AM 14/Oct/2024











