चिपळूण : जिल्ह्यात शनिवारी (ता. ७) बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने मुस्लिम बांधवांच्यावतीने विविध ठिकाणच्या मशिदींमध्येही नमाज पठण करण्यात आले. चिपळूण शहरासह जिल्ह्यात राहणाऱ्या मुस्लिम बांधवांना गेल्या काही दिवसांपासून बकरी ईदचे वेध लागून राहिले होते.
सणासाठीची खरेदी, तसेच कुर्बानीसाठीच्या बोकडांच्या खरेदीसाठी मुस्लिम बांधवांकडून प्राधान्य दिले गेले. शुक्रवारी सर्वच मुस्लिम बांधवांनी ईदच्या तयारीवर अखेरचा हात फिरवत शनिवारच्या नमाज पठणाची तयारी सुरू केली. शनिवारी सकाळी मशिदीत नमाज पठणासाठी मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी झाली होती. नमाज पठणानंतर एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांनी गळाभेटी घेतल्या. यानंतर आप्तस्वकीय, तसेच मित्र परिवारास शुभेच्छा देण्यात युवावर्ग मोठ्या प्रमाणात गुंतल्याचे दिसून आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 AM 09/Jun/2025












