आळंदी तीर्थक्षेत्राजवळ पशुवधगृहाच्या आरक्षणाला राजापूर वारकरी संप्रदायाचा विरोध

राजापूर : पिंपरी-चिंचवड महापालिकेने विकास आराखड्यात आळंदी तीर्थक्षेत्राजवळ पशुवधगृह बांधण्यासाठी दिलेल्या आरक्षणाला राजापूर तालुका अखंड वारकरी संप्रदायाच्या पाचल विभागाने विरोध केला आहे.

गुरूवारी (ता. ५) पाचल येथे झालेल्या वारकरी संप्रदायाच्या बैठकीत आयत्यावेळच्या विषयांमध्ये हिंदू जनजागृती समितीचे श्रीकृष्ण नारकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रस्तावित पशुवधगृहाविषयी माहिती सांगितली. त्यावर सर्व वारकऱ्यांनी एकमुखाने ठराव करून पशुवधगृहाला विरोध बैठकीत दर्शवला.

विषयपत्रिकेनुसारसंप्रदाय वाढीच्यादृष्टीने विचारविनिमय करण्यात आला. बैठकीला संप्रदायाचे अध्यक्ष बळिराम इंदुलकर उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:31 AM 09/Jun/2025