राजापूर : तालुक्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील हातिवले, कोंडये येथील उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने या पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत होती. काही काळ वाहतुकीलादेखील अडथळा होत आहे. गेली दोन-तीन वर्षे सातत्याने या पुलावर पाणी साचत असून महामार्ग विभाग अथवा ठेकेदाराने
कोणतीही उपाययोजना न केल्याने वाहनचालकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले असले तरी पावसाळ्यापूर्वीची देखभाल दुरुस्तीची कामे संबंधित ठेकेदार वा प्रशासनाने पूर्ण केलेली नाहीत. त्यामुळे महामार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच गटारे तुंबल्याने मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने त्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:39 AM 09/Jun/2025














