रत्नागिरी : जिल्ह्यात सोनं लुटून विजया दशमी साजरी

रत्नागिरी : घटनास्थापनादिनी ३ ऑक्टोबरला सुरुवात झालेल्या नवरात्रौत्सवाची सांगता शनिवारी विजया दशमी दिनी उत्साही वातावरणात झाली. जिल्ह्यात ४८७ ठिकाणी दुर्गामाता मूर्तींची प्रतिष्ठापना तर ९० ठिकाणी प्रतिमा पूजन करण्यात आले. यानिमित्त जिल्ह्यात दांडिया, गरबा नृत्यामध्ये तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता. येथील मांडवी समुद्र किनारी शनिवारी दुर्गामाता मूर्तीचे ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूका काढून विसर्जन करण्यात आले.

आनंद व मांगल्याचे प्रतीक असलेल्या दुर्गादेवीची प्रतिष्ठापना झाल्यापासून विजया दशमीपर्यंत मातेच्या भक्तांमध्ये उत्साह पहायला मिळाला. यानिमित्त अनेक नवरात्रौत्सव मंडळांनी दांडिया तसेच गरब्याचे स्पर्धात्मक कार्यक्रम आयोजित केले होते. अनेक ठिकाणी मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाईसह देखाव्यांचीही निर्मिती केली होती.

विजया दशमीदिनी शनिवारी सायंकाळी दुर्गामाता मूर्तीचे ठिकठिकाणी उत्साहात विसर्जन करण्यात आले. विजया दशमीदिनी सोनं लुटण्याच्या कार्यक्रमातही नागरिकांनी सहभागी होऊन एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 14-10-2024