रत्नागिरी : Assault on tourist शहरानजीकच्या भाट्ये समुद्रकिनारी गुरुवारी गोव्यातील होपना सोरेन (२४, मूळ रा. झारखंड सध्या रा. गोवा) याच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या दोघांच्या मुसक्या गुन्हे अन्वेषण शाखेने २४ तासांच्या आत आवळल्या. संशयितांना शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून अधिक तपास सुरु आहे.
पर्यटकावर प्राणघातक हल्ला Assault on tourist
कार्तिक जानकी दिगार (२३, रा. तोला आंबेडकर नगर, गाव-तंत्री, टुपकाढी जरिध जिल्हा बोकारो, झारखंड) व एक महिला (मूळ राहणार रा. फुसरो बाजार, जिल्हा बोकारो, झारखंड) अशी अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयितांची नावे आहेत. गुरुवारी भाट्ये येथील पोलीस तपासणी नाका येथे एक अनोळखी व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेमध्ये मदत मागण्यासाठी आला होता. तेथील पोलीसांनी त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेले. जखमीच्या कंठाजवळ गंभीर इजा झाल्याने आपल्यावर कोणी प्राणघातक हल्ला केला Assault on tourist याबाबत बोलता-सांगता येत नव्हते. या घटनेचे गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमधील अंमलदारांची या गंभीर गुन्ह्याची तत्काळ उकल करण्यासाठी विशेष पथके तयार केली.
या पथकामार्फत काही तासातच जखमी इसमाची तसेच हल्लेखोरांबाबत सर्व प्रकारची माहिती काढण्यात आली. जखमी हा गोवा राज्यातून रत्नागिरी येथे आलेला होता तसेच हल्लेखोर हे मूळचे झारखंड येथील रहिवासी असल्याचे व एम.आय.डी. सी, रत्नागिरी येथील एका नामांकित कंपनीमध्ये कामाला असल्याचे तांत्रिक माहितीच्या आधाराने शोधून काढले.

या पथकामार्फत कंपनीमधील उपस्थित व अनुपस्थित कामगारांची माहिती काढण्यात आली. तेव्हा यामध्ये असे निष्पन्न झाले की, कंपनीमधील दोनजण दि.१० ऑक्टोबर रोजी अनुपस्थित राहिले आहेत. व घटनेनंतर दुसऱ्या दिवशी ११ ऑक्टोबर रोजी दुपारी आपले सर्व साहित्य सामान घेऊन पळून जाण्याच्या उद्देशाने निघून गेलेले आहेत.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत या दोन्ही संशयिताची ओळख पटवण्यात आली व लागलीच रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथील सीसटीव्ही फुटेज तपासण्यात आले. तेव्हा दोन्ही संशयित हे भावनगर एक्सप्रेस ट्रेनमध्ये बसून मुंबईच्या दिशेने निघून गेलेले दिसून आले.
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातीत अनेक समुद्र किनारे आहेत. त्यातील एक म्हणजे रत्नागिरी शहराच्या जवळच असणारा समुद्रकिनारा,"भाट्ये समुद्रकिनारा" हा एक प्रसिद्ध किनारा आहे.या ठिकाणी पांढऱ्या रंगाची वाळू आढळते .समुद्र किनारी असणारे सुरू झाडांचे वन आहे.किनाऱ्या जवळच असणाऱ्या झरी विनायक ठिकाणी किनाऱ्यानजीक झरी विनायकाचे सुंदर मंदिर आहे.किनाऱ्या जवळच समुद्राला काजळी नदी येऊन मिळते तेथेच भाट्येची खाडी तयार होते.ह्याठिकाणी देशातून व राज्यातून खूप पर्यटक आकर्षित होतात. झरीविनायक मंदिर येथून जवळ आहे. प्रती गणपतीपुळे म्हणून हे देवस्थान प्रसिद्धी पावत आहे. येथे पर्वताच्या शिळेत उमटलेली जागृत गणेश प्रतिमा आहे. गाभाऱ्याच्या समोरच एक तळे आहे. गाभाऱ्याच्या जवळून वाहणाऱ्या गोमुखातून वाहणारे पाणी या तळ्यात साठते. हे तळे बारमाही पाण्याने भरलेले असते. जवळच समुद्र असूनही या झऱ्याचे पाणी गोडे आणि पिण्यायोग्य आहे हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल. या झऱ्यामुळेच हे गणेश मंदिर झरीविनायक म्हणून ओळखले जाते. येथे गणेश जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.
काही तासातच भावनगर एक्स्प्रेस ही रत्नागिमिधून रायगड जिल्ह्याच्या हद्दीमध्ये विनाथांबा जाणार असल्याचे लक्षात येताच रायगड पोलीस दलाची व रेल्वे पोलिस दलाची मदत घेऊन रायगडमधील माणगाव स्टेशनवर दोन्ही संशयितांना भावनगर एक्स्प्रेसमधून जाताना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात कलम १०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार सुभाष भागणे, शांताराम झोरे, नितीन ढोमणे, बाळू पालकर, विक्रम पाटील, अमित कदम, प्रवीण खांबे, गणेश सावंत, सत्यजीत दरेकर, रमिज शेख व शहर पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक निखिल माने यांनी केली.
भाट्ये किनारी पर्यटकांची नेहमीच वर्दळ
महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातीत अनेक समुद्र किनारे आहेत. त्यातील एक म्हणजे रत्नागिरी शहराच्या जवळच असणारा समुद्रकिनारा,”भाट्ये समुद्रकिनारा” हा एक प्रसिद्ध किनारा आहे.या ठिकाणी पांढऱ्या रंगाची वाळू आढळते .समुद्र किनारी असणारे सुरू झाडांचे वन आहे.किनाऱ्या जवळच असणाऱ्या झरी विनायक ठिकाणी किनाऱ्यानजीक झरी विनायकाचे सुंदर मंदिर आहे.किनाऱ्या जवळच समुद्राला काजळी नदी येऊन मिळते तेथेच भाट्येची खाडी तयार होते.ह्याठिकाणी देशातून व राज्यातून खूप पर्यटक आकर्षित होतात. झरीविनायक मंदिर येथून जवळ आहे. प्रती गणपतीपुळे म्हणून हे देवस्थान प्रसिद्धी पावत आहे. येथे पर्वताच्या शिळेत उमटलेली जागृत गणेश प्रतिमा आहे. गाभाऱ्याच्या समोरच एक तळे आहे. गाभाऱ्याच्या जवळून वाहणाऱ्या गोमुखातून वाहणारे पाणी या तळ्यात साठते. हे तळे बारमाही पाण्याने भरलेले असते. जवळच समुद्र असूनही या झऱ्याचे पाणी गोडे आणि पिण्यायोग्य आहे हे एक आश्चर्यच म्हणावे लागेल. या झऱ्यामुळेच हे गणेश मंदिर झरीविनायक म्हणून ओळखले जाते. येथे गणेश जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:49 AM 14/Oct/2024
अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन











