सरकारी बँकेत नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे! सेंट्रल बँक ऑफ इंडियाने (Central Bank of India) अप्रेंटिस पदांसाठी (Apprentice Posts) तब्बल ४,५०० जागांची मेगाभरती जाहीर केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, बँक करिअर करू इच्छिणाऱ्या पदवीधर उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
महत्वाच्या तारखा:
- अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: ०७ जून २०२५
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: २३ जून २०२५
- अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख: २५ जून २०२५
- ऑनलाइन परीक्षा: जुलैच्या पहिल्या आठवड्यात
अर्ज कुठे कराल? या भरतीसाठी इच्छुक उमेदवार सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट www.centralbankofindia.co.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात.
पदांची संख्या आणि शैक्षणिक पात्रता: सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण ४,५०० अप्रेंटिस पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी भारत सरकारने मान्यता दिलेल्या कोणत्याही विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा केंद्र सरकारने मान्यता दिलेली कोणतीही समकक्ष पात्रता धारण करणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असावी. विशेष म्हणजे, NATS पोर्टलवर (National Apprenticeship Training Scheme) नोंदणीकृत असलेले उमेदवारच या भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.
निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडेल: १. ऑनलाइन परीक्षा: BFSI SSC (Banking, Financial Services and Insurance Sector Skill Council) द्वारे ही ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. २. स्थानिक भाषेची चाचणी: संबंधित राज्याच्या स्थानिक भाषेत उमेदवाराची प्रवीणता (वाचन, लेखन, बोलणे आणि समजणे) तपासण्यासाठी एक चाचणी घेतली जाईल.
ऑनलाइन परीक्षेत एकूण १०० प्रश्न असतील आणि त्यासाठी १०० गुण दिले जातील. विशेष बाब म्हणजे, वस्तुनिष्ठ चाचण्यांमध्ये चुकीच्या उत्तरांसाठी कोणतेही नकारात्मक गुण (Negative Marking) नसतील.
कागदपत्र पडताळणी आणि नियुक्ती: ऑनलाइन परीक्षा आणि स्थानिक भाषेच्या चाचणीत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची सर्व कागदपत्रे पडताळणीनंतर गुणवत्ता यादीच्या आधारे नियुक्तीसाठी योग्य आढळलेल्या उमेदवारांना सरकारी अप्रेंटिसशिप पोर्टलद्वारे डिजिटल अप्रेंटिसशिप लेटर (Digital Apprenticeship Letter) जारी केले जाईल.
अर्ज शुल्क: अर्ज शुल्क श्रेणीनुसार भिन्न आहे:
- पीडब्ल्यूबीडी (PwBD) श्रेणीतील उमेदवार: ४००/- रुपये + जीएसटी
- एससी/एसटी/सर्व महिला उमेदवार/ईडब्ल्यूएस (EWS) श्रेणीतील उमेदवार: ६००/- रुपये + जीएसटी
- इतर सर्व उमेदवार: ८००/- रुपये + जीएसटी अर्ज शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागेल.
आमच्या नोकरी विषयक WhatsApp ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा
WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा
या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट www.centralbankofindia.co.in ला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही संधी गमावू नका आणि वेळेत अर्ज करा!













