रत्नागिरी जिल्ह्याच्या लसीकरण संनियंत्रकांची कामगिरी उल्लेखनीय

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्याच्या लसीकरण संनियंत्रकांची कामगिरी राज्यात उल्लेखनीय ठरली आहे.

संपूर्ण राज्यात आरोग्य सेवा संचालक, तसेच आरोग्य सेवा व अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली इम्युनायझेशन कव्हरेज स्टडी राबविण्यात आली.

त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील लसीकरण संनियंत्रक तुषार साळवी, बालाजी राठोड व श्वेता सावंत यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील विविध प्राथमिक व उपजिल्हा आरोग्य संस्थांना भेटी दिल्या. त्यांनी तेथील कार्यक्षेत्रातील 0 ते 5 वर्षे वयोगटातील नियमित लसीकरण लाभार्थ्यांची प्रत्यक्ष पडताळणी करून लसीकरणाच्या अंमलबजावणीचा अभ्यास केला. पडताळणी अहवाल कोल्हापूर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला.

या कामकाजासाठी रत्नागिरी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, तत्कालीन जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. पल्लवी पगडाळ, एसएमओ डॉ. खैरनारे, तसेच पीएचएन श्वेता तारये व प्रिया पेडणेकर, कौस्तुभ भाटकर, निलेश विचारे व अभिजित कांबळे यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले.

या उल्लेखनीय कामगिरीच्या गौरवार्थ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या हस्ते रत्नागिरी जिल्ह्यातील तिन्ही लसीकरण संनियंत्रकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 09-06-2025