पावस : रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे आणि गावखडी येथील समुद्रकिनाऱ्यावर संरक्षित केलेल्या कासवांच्या घरट्यातून ५ हजार ३८८ कासवाच्या पिल्लांनी समुद्राकडे झेप घेतली. दोन्ही ठिकाणी १७४ घरटी संरक्षित करण्यात आली होती.
रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे समुद्रकिनाऱ्यावर यावर्षी कासवांच्या २१ घरट्यांचे संवर्धन करण्यात आले होते. त्यातून ३८८ पिल्ले समुद्रामध्ये सोडण्यात आले. गेली दोन वर्षे गणेशगुळे समुद्रकिनाऱ्यावरही कासवांनी अंडी घालण्यास सुरुवात केली. हा परिसर सुरक्षित असल्याने अंडी घालण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे. सलग तिसऱ्या वर्षी या किनाऱ्यावर २१ घरटी संरक्षित करण्याचे काम कासवमित्र सचिन तोडणकर यांनी केले.
या २१ घरट्यांतून मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यांमध्ये ३८८ कासवांच्या पिल्लांनी समुद्रात झेप घेतली. संदर्भात तोडणकर म्हणाले, गेली दोन वर्षे या किनाऱ्यावर कासवांनी अंडी घालण्यास सुरुवात केली.
त्याचे संवर्धन करण्याचे काम करण्यात आले. यावर्षीही २१ घरटी संरक्षित आहेत. परंतु ही अंडी संरक्षित करताना हाताळल्यामुळे काही अडचणी निर्माण होतात. त्यामुळे सुदृढ कासवाची पिल्ले तयार होण्याचे प्रमाण कमी होते. गणेशगुळेबरोबरच वर्षे गावखडी कासव संवर्धन केंद्रामध्ये अंड्यांचे संरक्षण करण्याचे काम मोठ्या प्रमाणात केले जात आहे. यावर्षी या किनाऱ्यावर १५३ घरट्यांतून ५ हजार पिल्लांनी समुद्राच्या दिशेने झेप घेतली. पावसाळा सुरू झाल्याने कासवांच्या विणीचा हंगाम संपुष्टात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:55 AM 09/Jun/2025














