पाटगाव ‘सांब मंदिरा’कडील नवीन पुलाचे काम पूर्ण

साडवली : देवरूखजवळील पाटगाव सांबमंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर नवीन पूल उभारण्यात येत आहे. महामार्गाला जोडणाऱ्या या रस्त्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. या पुलासाठी आमदार शेखर निकम यांनी दीड कोटींचा निधी मंजूर केला होता. या पुलामुळे मोठी वाहने मंदिरापर्यंत जातील.

सप्तलिंगी नदीवर लोखंडी अरूंद पूल होता. त्यावर लाकडी फळ्यांचा वापर केला होता. कालांतराने लाकडी फळ्या निखळू लागल्या. श्रावण सोमवारी या मार्गावर भाविकांची गर्दी होत होती. त्यानंतर या पुलावर लोखंडी पत्रे लावण्यात आले. या ठिकाणी चांगला पूल व्हावा यासाठी ग्रामस्थांनी पाठपुरावा केला. आमदार निकम यांनी यासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर पुलाचे काम सुरू झाले.

या मार्गावर रूंद पूल उभारण्यात आला आहे. दोन्ही बाजूच्या रस्त्याची कामे सुरू झाली आहेत. यंदा श्रावणात भाविकांना वाहने घेऊन मंदिरापर्यंत जाता येणार आहेत. त्यासाठी पाटगाव व देवरूख परिसरातील भाविकांनी आमदार निकम यांचे आभार मानले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:01 PM 09/Jun/2025