सावर्डे : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आरवली (ता. संगमेश्वर) येथे रस्ता ओलांडणे हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील मुलांची सत्त्वपरीक्षाच ठरणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या पालकांचा जीवही टांगणीला लागणार आहे. ही शाळा महामार्गाच्या विरुद्ध बाजूला असल्याने शाळेत जाणे धोकादायक ठरू शकते. झेब्रा क्रॉसिंग किंवा सिग्नल नसल्यामुळे लहान मुलांना रस्त्याच्या पलीकडे जाणे सहजसोपे होणार नाही. त्याकडे प्रशासन गांभीर्याने पाहणार का, असा प्रश्न ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.
प्राथमिक व माध्यमिक शाळांचे नवीन शैक्षणिक १६ जूनपासून सुरू होत आहे. त्यामुळे मुलांची शाळांमध्ये जाण्यासाठीची वर्दळ ठिकठिकाणी सुरू होणार आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होत असतानाच आरवली (ता. संगमेश्वर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ३ मधील विद्यार्थ्यांच्या पालकांना वेगळीच चिंता भेडसावत आहे. शाळा सुरु झाल्यानंतर गावातील भोसलेवाडी, कुलकर्णीवाडी, राजवाडी येथील मुलांना प्राथमिक व माध्यमिक शाळेत जाण्यासाठी चौपदरी महामार्ग दररोज ओलांडावा लागणार आहे.
महामार्गावरून मोठ्याप्रमाणात वेगाने वाहनांची वर्दळ सुरू असते. झेब्रा क्रॉसिंग किंवा सिग्नल नसल्याने लहान मुलांना महामार्ग ओलांडताना जीव मुठीत धरावा लागणार आहे. त्यामुळे अपघाताचा मोठा धोका असून, त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
महामार्गाचे चौपदरीकरण करताना प्रशासनाकडून याची गांभीयनि दखल घेणे गरजेचे होते, परंतु त्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे.
जिल्हा परिषद शाळा महामार्गाच्या पूर्वेला आहे, तर लोकवस्ती महामार्गाच्या पश्चिमेला आहे. या शाळेत परिसरातील सुमारे ३५ अधिक मुले पहिलीच चौधीसह अंगणवाडीत येणार आहेत. शाळेत पोचण्यासाठी विद्याथ्यांना दररोज महामार्ग ओलांडावा लागणार आहे. अन्यथा अरुंद सेवा रस्त्यावरून एक किलोमीटर पायी चालत उड्डाणपुलाखालून वळसा घालत शाळेत पोहचावे लागणार आहे. त्या सस्त्यावरही वाहनांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे लहान मुलांना जीव मुठीत घेऊनच मार्गक्रमण करावे लागणार आहे. ग्रामस्थांनी शाळेजवळ गतिरोधक, सिग्नल अथवा लोखंडी पूल उभारण्याची मागणी केली आहे.
स्थानिक ग्रामपंचायत व शाळा प्रशासनानेही याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिसांना निवेदन दिले पाहिजे. विद्यार्थ्यांचे आयुष्य धोक्यात न टाकता लवकरात लवकर सुरक्षिततेची उपाययोजना करणे गरजेचे आहे. प्रशासनाने याबाबत तत्काळ पावले उचलून मुलांच्या शिक्षणाची वाटचाल सुरक्षित करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
चौपदरी महामार्ग झाल्यानंतर मुलांना शाळेत जाण्यासाठी अडचण 16 होणार हे ग्रामस्थांना माहिती होते. यासंबंधी शाळेच्या मार्गावर पादचारी पूल व्हावा म्हणून ग्रामपंचायतीने गतवर्षी रस्ते बांधकाम आधिकाऱ्यांबरोबर बैठकही घेतली होती. तसे निवेदनही दिले होते, मात्र अद्याप कार्यवाही करण्यात आलेली नाही- देवयानी परकर, उपसरपंच, आरवली
पूर्व प्राथामिक शाळा क्र. ३ जवळून जाणारा महामार्गावरील रस्ता उताराचा आहे. तिथे वाहने सुसाट असतात. गतवर्षी माल्तीमारुती फणसे या शेतकऱ्याचा रस्ता ओलांडताना अपघातात मृत्यू झाला होता. शेतकऱ्यांनाही शेती करण्यासाठी अधूनमधून रस्ता ओलांडावा लागणार आहे. मुलेही शाळेत जाणार आहेत. यादरम्यान रस्ता सुरक्षित करण्याची गरज आहे- आनंद हरिश्चंद्र नवरंग, पालक
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 PM 09/Jun/2025














