खेड : खचलेला निळवणे-कातळवाडी रस्ता बनला धोकादायक

खेड : गतवर्षी झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीत निळवणे-कातळवाडी रस्ता पूर्णतः खचून मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. अजूनही रस्त्याची डागडुजी करण्याची तसदी घेण्यात आलेली नाही. सद्यस्थितीत ग्रामस्थ पायवाटेवरूनच मार्गक्रमण करीत आहेत.

गतवर्षी सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीत मार्गस्थ होण्यास अडसर निर्माण झाल्याने निळवणे कातळवाडी रस्ता खचला झाला होता. या मार्गाची दैना उडालेली असतानाही अजूनही दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.

पायवाट बंद होण्याच्या शक्यतेने ग्रामस्थांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. विशेषतः शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल होणार असून, रुग्णांनाही गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे प्रशासनाने मार्गाच्या डागडुजीसाठी त्वरित पुढाकार घेऊन दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:33 PM 09/Jun/2025