चिपळुणात वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या रोपांचे वाटप

चिपळूण : मंगळवार, दि. १० जून रोजी साजऱ्या होणाऱ्या वटपौर्णिमेनिमित्त वृक्षसंवर्धन व पर्यावरण रक्षणाचा संदेश देत एक आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येत आहे.

श्री देव जुना कालभैरव देवस्थान, सामाजिक वनीकरण विभाग (महाराष्ट्र शासन) आणि अॅक्टिव्ह ग्रुप यांच्यावतीने रविवार दि. ८ जून रोजी सकाळी १० ते सायंकाळी ७ आणि सोमवार दि. ९ जून रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत जुना कालभैरव मंदिर परिसरात वडाची रोपे वाटप करण्यात येणार आहेत.

वटपौर्णिमेच्या दिवशी फांद्या आणून पूजा न करता, वडाची रोपे लावून त्याचे पूजन करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. यामुळे एकीकडे पर्यावरण पूरक सण साजरे होतील आणि दुसरीकडे वृक्षसंवर्धनालाही हातभार लागण्यास मदत होणार आहे. यावेळी महिलांनी व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:46 PM 09/Jun/2025