रत्नागिरी : राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धेत अभ्यंकर कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयातील गणित विषयाचे शिक्षक मयुरेश कांदळकर यांना जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक मिळवला आहे. आजच्या आधुनिक काळामध्ये ऑनलाईन शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे दर्जेदार ई- साहित्याची निर्मिती व्हावी, या अनुषंगाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होईल आणि त्यातून विद्यार्थ्यांकरिता शैक्षणिक साहित्य सहजपणे उपलब्ध करून देता येईल, असा या स्पर्धेचा उद्देश होता.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 AM 14/Oct/2024











