पाचल : रायपाटण बीटमध्ये काम करताना पाचल परिसरातील जनतेचे प्रेम, उत्तम सहकार्य आणि पाठबळ लाभले. यामुळे पाचल परिसरात कायदा-सुव्यवस्था, सलोखा राखण्यात आपण यशस्वी झालो, असे प्रतिपादन रायपाटण पोलिस बीट अंमलदार कमलाकर तळेकर यांनी केले.
तळेकर यांची सहायक पोलिस उपनिरीक्षकपदी पदोन्नती होऊन त्यांची रत्नागिरी पूर्णगड पोलिस स्टेशन येथे बदली करण्यात आली. यानिमित्त पाचल येथे त्यांचा सत्कार व त्यांना निरोप देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी सरपंच बाबालाल फरास आणि उपसरपंच आत्माराम सुतार यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी करक गावचे सरपंच सुरेश ऐनारकर, माजी उपसरपंच किशोर नारकर, सरपंच अमर जाधव, शाहू पाटेकर, संजय राणे, दक्षता समिती सदस्य धनश्री मोरे, पाचल तंटामुक्त समिती अध्यक्षा पूजा शिगम, शिशीताई देवरुखकर, माजी पोलीस पाटील रवींद्र खानविलकर, ग्रा.पं. सदस्य विनायक सक्रे आदी उपस्थित होते. यावेळी त्यांना किशोर नारकर, अमर जाधव, सुरेश ऐनारकर, पत्रकार सुरेश गुडेकर, धनश्री मोरे, पूजा शिगम, अण्णा पाथरे यांनी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक तुषार जाधव यांनी केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:40 PM 09/Jun/2025














