रत्नागिरी : आठवडा बाजार येथे मद्यपान करणाऱ्या प्रौढाविरुद्ध गुन्हा दाखल

रत्नागिरी : शहरातील आठवडा बाजार येथील पालिकेच्या इमारतीजवळील सार्वजनिक ठिकाणी देशी मद्यपान करणाऱ्या प्रौढाविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समिर नुरुद्दीन सोलकर (वय ४६, रा. शेट्येनगर, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ७) रात्री आठच्या सुमारास आठवडाबाजार येथील पालिकेच्या इमारतीजवळ घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित हा सार्वजनिक ठिकाणी देशी दारु पित असताना सापडला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल दिनेश हरचकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित प्रौढाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:56 09-06-2025