संगमेश्वर : गोळवली येथे चिखलामुळे अपघाताचा धोका

देवरूख : मुंबई-गोवा महामार्गवरील संगमेश्वर तालुक्यातील गोळवली येथील महामार्ग काँक्रीटीकरण प्लांटच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल साचला आहे. या चिखलामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. याठिकाणी अनेक वाहन चालक घसरून पडले आहेत. याठिकाणी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

गोळवली येथील रस्त्यावर आलेल्या चिखलामुळे होणाऱ्या अपघातांबाबत स्थानिक ग्रामस्थांनी आणि प्रवाशांनी अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. मात्र, या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. याकडे आमदार शेखर निकम यांनी लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे. याठिकाणी अपघात झाला, तर त्याला पूर्णतः बांधकाम विभाग जबाबदार असेल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:55 PM 09/Jun/2025