दापोली : रत्नागिरी जिल्ह्यात विशेषतः कोकण किनारपट्टीवर कासव संवर्धन मोहिमेला कासव मित्रांच्या सहकार्यामुळे बळ मिळत आहे. जिल्ह्यात कासवांचे ४६ मित्र ही मोहीम अधिक पारदर्शकपणे राबवण्यासाठी कांदळवन विभागाशी समन्वय साधून अहोरात्र झटत आहे. या मोहिमेतील कासव मित्रांच्या यशस्वी सहभागामुळे जिल्ह्यात कासवांची घरटी वाढली आहेत. त्यामुळे कासव संवर्धन मोहिमेत या वर्षी कासव मित्रांचा अधिक प्रभाव दिसला आहे.
किनारपट्टीवर तासन्तास पायी चालत ऑलिव्ह रिडले कासवांच्या घरट्यांचा शोध घेणे, त्या घरट्यात अंडी संरक्षित करणे, अंड्यांची चोरी होऊ नये या साठी बारीक लक्ष ठेवणे, अन्य धोक्यांपासून घरट्यांचे रक्षण हे कासव मित्र करतात. कासवांचे महत्त्व आणि त्यांचे रक्षण या बाबत कासव मित्र जनजागृती करत असून कासव महोत्सव या सारखे अभिनव उपक्रम राबवून या मोहीमेला अधिक बळकटी देण्याचे काम दरवर्षी करत आहेत.
ऑलिव्ह रिडले असलेली जनजागृती यामुळे कासव मित्रांमुळे कासव संवर्धन मोहीम अधिक गतिमान होतेय कासवांचे महत्व आणि होत असलेली यामुळे या वर्षी हंगामाच्या शेवटी १ हजार ३५१ घरट्यातून ५० हजार १५१ कासवांची पिल्ले समुद्रात झेपावली आहेत. हंगामाच्या सुरुवातीला फेब्रुवारी महिन्यात ४७८ घरटी सापडली होती. त्यात वाढ होऊन मार्च महिन्यात हा आकडा १००५ वर पोहोचला. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर कासव संवर्धन मोहीम दरवर्षी प्रभावीपणे राबवली जाताना दिसत आहे.
या वर्षी सर्वाधिक दाभोळ किनाऱ्यावर १९१ घरटी
२०२४ मध्ये १६ किनाऱ्यावर ६८० घरटी
२०२५ मध्ये २३ किनाऱ्यावर १ हजार ३५१ घरटी
कासव मित्रांची संख्या वाढल्याने मोहीम अधिक गतिमान होते
समुद्र किनारे व कासवमित्र
गावखडी २, गणेशगुळे २, वाडावेत्ये २, माडबन २, लाडघर २, दाभोळ २, कोळथरे २, केळशी २, आंजर्ले २, मुरुड २, कर्दे २, गुहागर ७, तवसाळ २, रोहिले २, वेळास २, मालगुंड २, गणपतीपुळे १, भाटये २, आडे १, काळबादेवी १, आंबोळगड २, अणसुरे पंगेरेवाडी १, जैतापूर १
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:15 PM 09/Jun/2025














