मंडणगड : मंडणगड नगरपंचायत कार्यालय दुसऱ्या मजल्यावर असल्याने शहरातील अपंग, ज्येष्ठ नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. नगरपंचायतीचे सुसज्ञ्ज कार्यालय नगरपंचायत व्यापारी संकुलाचे दुसऱ्या मजल्यावर सुरू आहे. या मजल्यावर येण्यासाठी संकुलात कोणतीही लिप्ट नाही, त्यामुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक, अपंग, व्याधीग्रस्त नागरिक, महिला, गरोदर माता यांना नगरपंचायत कार्यालयाशी संबंधीत कामाकरिता दोन मजले पाई चढून जावे लागते व काम संपल्यावर खाली उतरावे लागते.
संबंधीत काम एकाच खेपेत होईल याची कोणतीही खात्री नसल्याने कामासाठी नागरिकांना अनेक फेऱ्या माराव्या लागतात. यामुळे शहरातील ज्येष्ठ नागरिक, अपंग, व्याधीग्रस्त नागरिक, महिला, गरोदर माता यांची मोठी अडचण होते; पण नागरिकांच्या या समस्येकडे लक्ष देण्यासाठी सत्ताधारी प्रशासन यांना वेळ नाही.
नागरिकांना नगरपंचायतीकडून जन्म व मृत्यू दाखले, ओळखीचे दाखले, नगरपंचायत कार्यालयाशी संबंधीत विविध परवाने यासाठी वेळोवेळी तिसऱ्या मजल्यावर जावे लागते. बरेचदा एका कामासाठी ३ ते ४ वेळाही कार्यालयास भेट द्यावी लागते. समस्याग्रस्तांची ही अडचण लक्षात घेता व्यापारी संकुलात विजेवर चालणारी लिप्ट बसवणे गरजेचे आहे व ते शक्य नसल्यास दाखले व संबंधीत कामासाठी नगरपंचायतीने व्यापारी संकुलाचे तळमजल्यावर आपला स्वतःचा संपर्क कक्ष सुरु करणे गरजेचे आहे. ज्यामुळे या संपर्क कक्षाचे माध्यमातून सर्व कामे चालतील व नागरीकांना तीन मजले चढावे लागणार नाहीत.
नगरपंचायत कार्यालय बहुमजली असल्याने अनेक नगरपंचायत कार्यालयात तळमजल्यावर अशा प्रकारे संपर्क कक्ष आजही कार्यान्वीत असल्याचे दिसून येते या संदर्भातील तांत्रीक व कायदेशीर बाजू अभ्यासून व गरज भासल्यास अन्य ठिकाणी असलेल्या अशा प्रकारचे कार्यालयांची कार्यपध्दती अभ्यास करुन संबंधीत यंत्रणा मंडणगडमध्ये तातडीने अशा प्रकारे संपर्क कक्ष करुन नागरीकांचे अडचण दूर करावी, अशी मागणी समस्याग्रस्तांमधून केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:40 PM 09/Jun/2025














