“मोदी सरकार उत्सव करत असताना लोकं रेल्वेतून पडून मेली” मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधींची टीका

Rahul gandhi on Mumbra Train Accident: दोन लोकल रेल्वे क्रॉस होत असताना धक्का लागून भयंकर घटना मुंब्रा रेल्वे स्थानकानजीक घडली. यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबद्दल बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी मोदी सरकारवर बरसले.

मोदी सरकार सेवेचा आनंदोत्सव करत असताना देशातील सत्य परिस्थिती मुंबईतून येत आहे. लोक रेल्वेतून पडून मेले आहेत.

मुंब्रा रेल्वे स्थानकावरील घटनेवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारला धारेवर धरले.

राहुल गांधी म्हणाले, “मोदी सरकार ११ वर्षातील सेवेचा उत्सव साजरा करत असताना देशातील परिस्थिती मुंबईतून येत असलेल्या दुःखद घटनेमध्ये दिसत आहे. रेल्वेमधून पडून अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.”

मोदी सरकारची ११ वर्षे फक्त प्रचार

“भारतीय रेल्वे कोट्यवधी जिवांचा कणा आहे. पण, आज असुरक्षा, गर्दी आणि विस्कळीतपणाचे प्रतीक बनली आहे. मोदी सरकारचे ११ वर्षे ना उत्तरदायित्व आणि ना बदल, फक्त प्रचार अशी आहेत”, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

“सरकारने २०२५ बद्दल बोलणं सोडून दिलं आहे, आता २०४७ ची स्वप्न विकत आहे. मी मृतांच्या कुटुंबीयांप्रति सहवेदना व्यक्त करतो आणि जखमींची प्रकृती लवकर बरी व्हावी, अशी प्रार्थना करतो”, असे राहुल गांधी म्हणाले.

रेल्वेतून पडून यांचा झाला मृत्यू

१) राहुल संतोष गुप्ता (वय २८, रा. दिवा)

२) केतन दिलीप सरोज (वय २३, रा. तानाजी नगर, उल्हासनगर)

३) मयूर शाह (वय ५० )

४) विकी बाबासाहेब मुख्यदल (वय ३४, रेल्वे पोलीस कर्मचारी)

जखमी व्यक्तींची माहिती खालीलप्रमाणे

१) शिवा गवळी (वय २३ वर्ष. यांची प्रकृती चिंताजनक असल्याने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथून ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.)

२) आदेश भोईर (वय 26 वर्ष, रा. आटगाव, कसारा, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.)

३) रिहान शेख (वय २६ वर्ष, रा. भिवंडी, प्रवास: कल्याण ते ठाणे, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)

४) अनिल मोरे (वय४० वर्ष, यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी ज्युपिटर हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले आहे.)

५) तुषार भगत (वय २२ वर्ष, प्रवास: टिटवाळा ते ठाणे, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.)

६) मनीष सरोज (वय २६ वर्ष, पत्ता: दिवा साबेगाव, दिवा यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)

७) मच्छिंद्र गोतारणे (वय ३९ वर्ष, राहणार: वाशिंद, यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)

९) स्नेहा धोंडे (वय २१ वर्ष, राहणार: टिटवाळा, प्रवास: टिटवाळा ते ठाणे यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)

९) प्रियंका भाटिया (वय २६ वर्ष, राहणार: शहाड, कल्याण यांची प्रकृती स्थिर आहे व त्यांच्यावर शिवाजी महाराज रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत)

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:55 09-06-2025