लातूर/पुणे, ०९ जून २०२५ : महाराष्ट्रातील एक अग्रगण्य सहकारी बँक असलेल्या दि लातूर अर्बन को-ऑप बँक लि. ने विविध पदांसाठी थेट मुलाखती (Walk-in-Interview) जाहीर केल्या आहेत. बँकेच्या एकूण २१ शाखा असून, १३०७ कोटी रुपयांचा व्यवसाय आहे. सध्या बँकेला आयटी अधिकारी, तसेच पुणे येथील लक्ष्मी रोड शाखेसाठी शाखा व्यवस्थापक आणि लोणी काळभोर व उरुळी कांचन शाखेसाठी अधिकारी, लिपिक व शिपाई यांची आवश्यकता आहे.
पदांचा तपशील आणि आवश्यक पात्रता:
- आयटी अधिकारी: पदवीधर आणि संबंधित क्षेत्रात अनुभव आवश्यक.
- शाखा व्यवस्थापक (लक्ष्मी रोड, पुणे): B.Com., M.Com., MBA, CA, ICWA, JAIIB, CAIIB यापैकी कोणतीही पदवी/अर्हता तसेच सहकारी बँकेतील कामकाजाचा अनुभव आणि प्रभावी संगणक ज्ञान आवश्यक.
- अधिकारी (लोणी काळभोर व उरुळी कांचन शाखा): B.Com., M.Com., MBA, CA, ICWA, JAIIB, CAIIB यापैकी कोणतीही पदवी/अर्हता तसेच सहकारी बँकेतील कामकाजाचा अनुभव आणि प्रभावी संगणक ज्ञान आवश्यक.
- लिपिक (लोणी काळभोर व उरुळी कांचन शाखा): पदवीधर (B.Com, BBA इ.) असणे आवश्यक.
- शिपाई (लोणी काळभोर व उरुळी कांचन शाखा): किमान १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक.
मुलाखतीची तारीख आणि वेळ:
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मंगळवार, दिनांक १० जून २०२५ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी ०२:०० या वेळेत थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.
मुलाखतीचे ठिकाण (पुणे):
दि लातूर अर्बन को-ऑप बँक लि., लुल्लानगर पुणे शाखा कार्यालय, B-१२, प्रेमदीप बिल्डिंग, सिंधहिंदू सोसायटी, माणिकचंद मालाबार हिल्स समोर, KTM शोरूम शेजारी, कोंढवा गोळीबार मैदान रोड, लुल्लानगर, कोंढवा, पुणे – ४११०४०.
आमच्या नोकरी विषयक WhatsApp ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा
WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा
नोंदणी प्रक्रिया:
मुलाखतीस उपस्थित राहण्यापूर्वी उमेदवारांनी श्री. राजेश बावाडे (मोबाईल क्र.: ८८५६९२२०८६) यांच्याशी संपर्क साधून आपली नोंदणी करावी. तसेच, उमेदवारांनी आपला रेझ्युमे (केवळ रेझ्युमे पेज) career@laturbank.co.in या ईमेल आयडीवर पाठवणे आवश्यक आहे.
या संधीचा लाभ घेऊन बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी वेळेत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे.
दिनांक: ०९/०६/२०२५ मुख्यालय: स्व. रामगोपालजी राठी बिजनेस सेंटर, शिवाजीनगर, लातूर ४१३५३९ (महाराष्ट्र) वेबसाईट: www.laturbank.co.in













